आम्ही २ ते ३ दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतर लॉकडाऊन करायचा की नाही, याबद्दलचा निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी बरीच गर्दी पाहायला मिळाली. कोरोना या गर्दीत आपोआप मरून जाईल की काय अशी परिस्थिती होती. कोरोनाची दुसरी लाट येईल असं आता म्हटलं जात आहे. सरकारनं अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,' असं पवार यांनी सांगितलं.
कोरोना रुग्णांचा आकडा वाढला
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे ५ हजार ७६० नवे रुग्ण आढळून आले. तर ६२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा ४६ हजार ५७३ वर पोहोचली. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख ४७ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७९ हजार ८७३ जणांवर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री संवाद साधणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करणार