Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपुरात आणखी एका इसमाची हत्याचंद्रपूर :- शहरातील बस्थानका जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅक वरती  ५ नोव्हेंबरला रात्री 9 च्या सुमारास एक इसम जखमी अवस्थेत आढळून आला होता, रामनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता जखमी इसमाला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्या इसमाचा मृत्यू झाला.
रामनगर पोलिसांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त केली, तपासाचे चक्र फिरवले असता रामनगर पोलिसांनी भारत मडावी या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याने आपणच त्या इसमाला मारहाण करून उडानपुलाखाली फेकले असल्याची कबुली दिली.
एका फोटो लॅब मध्ये काम करणारे प्रशांत माहुरकर हे रात्री वसुली करून परत दुकानाकडे जात होते आरोपी भारत मडावी यांनी प्रशांत जवळ असलेली पैश्याची बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला , यामध्ये भारतने प्रशांत ला बेदम मारहाण करीत पुलाखाली फेकले, खाली पडल्याने प्रशांत गंभीररीत्या जखमी झाला होता, मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाही, रामनगर पोलिसांनी आरोपी भारतवर खुनाचा गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies