हुंड्यासाठी पत्नीची गळा दाबून हत्या
पतीसह चार जणांना अटकचंद्रपूर : हुंडा आणत नसल्याने पतीने राणाच्या भरात गळा दाबून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील जुनोना परिसरातील विरसा मुंडा चौकात घडली. नेहा नागेंद्र देवांगण असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती नागेंद्र देवांगण, दीर रवी देवांगण,
सासू सुभद्रा देवांगण, सासरा किसनलाल देवांगण या चौधांना रामगनर पोलिसांनी कलम ३०२, ४९८ अ,३०४ ब अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

नागेंद्र देवांगण हा आपल्या पत्नी नेहाला हुंड्यासाठी नेहमी त्रास देत होता. बुधवारी हुंडयासाठी नागेंद्रचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे त्याने रागाच्या भरात नेहाची गळा दाबून हत्या केली. मात्र आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्याने तिला प्रकृतीचा बहाणा करत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर सादर महिलेचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता पती नागेंद्र देवांगण यानेच नेहाची गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रामनगर पोलिसांनी पती, देर, सासू, सासरा, दीर या चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी दिली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजूरकर करीत आहेत.

Post a comment

0 Comments