प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन युवतीवर चाकूने हल्लासिंदेवाही :- तालुक्यातील पाथरी रोडवरील राकेश एन्टरप्राइजेस च्या समोर आज ( 18 नोव्हेंबर ) सकाळी 10.30 वा. च्या सुमारास 17 वर्षीय
अल्पवयीन युवतीवर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी नकार
दिल्याच्या कारणावरून 22 वर्षीय युवकाने चाकूने हल्ला केला. आरोपीविरुद्ध सिंदेवाही पोलिसात स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

याआधी आरोपी युवकाने पाच सहा महिन्यापूर्वी सदर युवतीशी गड्मौशी येथे जबरीने प्रेम संबंध प्रस्थापित केल्याचेही बयान पीडित युवतीने पोलीसांना तक्रारीत नमूद केले आहे सिंदेवाही पोलिसात दाखल तक्रारीनुसार, हेटी वॉर्ड सिंदेवाही निवासी पीडित युवती आपल्या आई सोबत नागभीड तालुक्यातील नवखळा येथे जाण्यासाठी सिंदेवाही बस स्टॉपकडे पायदळ जात असतांना मूळचा चिमूर तालुक्यातील काजळंसर येथील रहिवासी असलेला व हल्ली सिंदेवाही तालुक्यातील गड्मौशी येथे राहत असलेला आरोपी सुरेश सुधाकर सामुसकडे ( वय - 22) युवतीजवळ आला. युवतीला थांबविले.

माझ्यासोबत का बोलत नाही, प्रेमसंबंध का ठेवत नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तू जर माझ्यासोबत लग्न केले नाही तर दुसर्यासोबत लग्न करण्यासाठी मी तुला जीवंत ठेवणार नाही, असे म्हणून पीडितेला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या नाकावर चाकूने हल्ला केला.

Post a comment

0 Comments