Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मनोज अधिकारी हत्या प्रकरणाची अनसुलझी "गुत्थी" !चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरात राहणारे समाजसेवक मनोज अधिकारी यांची दाताळा परिसरातील सिनर्जी वर्ल्ड येथे दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी हत्या करण्यात आली. या हत्याकांडात संशयित आरोपी रविंद्र बैरागी, नगरसेवक अजय सरकार आणि धनंजय देबनाथ या तिघांना अटक केली, परंतु या प्रकरणातील संशयित भुमिकेत असणारी 'ती' तरूणी अजून ही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तपासातील शिथीलता बघून पोलिस अधिक्षकांनी रामनगर पोलिसांकडून या हत्या प्रकरणाच्या तपासाची धुरा ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचेकडे सोपविली. सहा. पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे हे या प्रकरणाचा तपास करित असून स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूर ‘मनोज अधिकारी' हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात अपयशी झाल्याचे सध्याचे चित्र आहे. 


महत्वाचे म्हणजे अटकेतील आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये अपराधी प्रवृत्तींनी मोठ्या प्रमाणात तोंड वर काढले आहे. हत्या प्रकरणाने चंद्रपूर जिल्हा ढवळून निघाला होता. त्यातचं नव्या पोलिस अधिक्षकांनी पदभार सांभाळताबरोबर मनोज अधिकारी हत्या प्रकरण घडल्यामुळे नवनियुक्क्त पोलिस अधिक्षकांनी स्वतः या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले होते. या प्रकरणातील आरोपींनी पोलिस तपासात सहकार्य न करता वेळोवेळी आपली भुमिका बदलविल्यामुळे तपास यंत्रणेसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला. आता स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार बाबासाहेब खाडे यांनी सांभाळला आहे. नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनात एलसीबी पथकाने बल्लारपूरातील सुरज बहरिया हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली. आता मनोज अधिकारी हत्या प्रकरणातील 'गुथ्थी' सोडविण्यात येईल की काय ? अशी चर्चा सुरू झाली आहे. हत्या स्थळावर अनेक वस्तु पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतल्या होत्या, त्यातुन हत्या प्रकरणाचा उलगडा होवू शकेल काय ? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. समाजसेवक मनोज अधिकारी यांच्या हत्येमुळे चंद्रपूर शहरात खळबळ माजली होती. हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बंगाली कॅम्प परिसरातील नागरिकांनी पोलिसांना घेराव केला होता. कोसारा येथील सिनर्जी वर्ल्ड मध्ये मनोज अधिकारी यांच्या स्वतःच्या प्लॅट मध्ये ही हत्या झाली होती व त्यांचा मृतदेह हा नग्नावस्थेमध्ये होता. त्यामुळे प्रेम प्रकरणातून तर ही हत्या झाली नाही ना ! असा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणातील 'त्या' महिलेवर अनेक शंका-कुशंका उत्पन्न झाल्यात. अधिकारी यांच्या हत्येला आज ४० दिवसांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असून हत्येचे कारण शोधण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आलेले आहे. नुकतेच रूजू झालेले एलसीबी चे निरीक्षक बाबासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात हे प्रकरण कोणते वळण घेते हे येणाऱ्या काही दिवसांत कळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies