अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यूचंद्रपूर :- नागपूर चंद्रपूर महामार्गा वरील येनसा गावाजवळ एका अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री ९.३० चा सुमारास घडली. ही धडक इतकी जोरदार होती की बिबट्याच्या जागीच मृत्यू झाला. बिबट्याच्या जबड्याला चांगलीच दुखापत झाली रक्ताने माकलेला तो रस्त्याच्या बाजूला पडून लोकांना दिसला. येनसा ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व वनविभागाला या सर्व प्रकाराची माहिती दिली.

Post a comment

0 Comments