चंद्रपुरात प्रियकराने प्रियसीचा डोक्यात रोड घालून केली हत्या


चंद्रपूर – शहरात पुन्हा एकाच्या हत्येने एकच खळबळ उडाली.
28 वर्षीय दुर्गा उमरे नामक महिलेला राकेश ढोले याने लाकडाने वार करीत दुर्गा ला ठार केले.

32 वर्षीय राकेश ढोले याचा विवाह झाला असून त्याला 2 मुलं सुद्धा आहे, पण राकेश चे सूत दुर्गा सोबत जुडल्याने तो पत्नीपासून विभक्त रहायला लागला होता, मागील 8 महिन्यापासून तो पत्नी व मुलाजवळ गेला नसल्याने त्याची पत्नी वारंवार संपर्क साधत घरी येण्याची विनंती करीत होती मात्र राकेशचा जीव हा दुर्गावर जडल्याने तो घरी जात नव्हता.

8 महिन्याच्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये दुर्गासोबत त्याचे नेहमी वाद व्हायचे.
आज त्या वादाचा जणू बांधच फुटला, सकाळी राकेश ची पत्नी त्याच्या जूनोना चौकातील दुर्गाच्या घरी पोहचली असता तिघांचा वाद खूप वाढल्याने राकेशने आपल्या पत्नीला गावी जायला सांगितले मी बघून घेतो सर्व तुम्ही घरी जा.
घरी गेल्याने राकेशने दुर्गाचे काही न ऐकता तिच्या डोक्यावर लाकडाने वार केला, वार इतका जोरदार होता की दुर्गाचा जागीच मृत्यू झाला.
दुर्गा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती त्यानंतर राकेशने स्वतः रामनगर पोलीस स्टेशन गाठून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Post a comment

0 Comments