Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

दुप्पट्यावरून जॉनीने शोधला खुनाचा आरोपी




     पुलावरून खाली फेकल्याचे प्रकरण


चंद्रपूर : श्वान पथकामार्फत आरोपीचा शोध घेतला जाते. मात्र निराशाच हाती पडल्याचे आजवर पुढे आहे. असे असताना चंद्रपूरातील श्वान पथकात असलेल्या श्र्वाणाने दुप्पट्यावरून खुनाच्या आरोपीचा २४ तासात शोध घेण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. या श्वानाचे नाव जॉनी असून
त्याने आयपीसी (इंडियन पीनल कोर्ट)चे प्रशिक्षण घेतले आहे. तो जर्मन शेफर्ई प्रजातीचा आहे. जॉनीने पड़कलेल्या आरोपीचे नाव भारत राजू मडावी (3२) रा. जलनगर वार्ड चंद्रपूर असे आहे. आरोपीला न्यायालयाने १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रशांत माहुरकर हे गुरुवारी सायंकाळी हातात बँग घेतून जात असताना प्रियदर्शिनी चौकाजवळ चोरट्याने बँग हिसकावली. यावेळी दोघामध्ये हातापायी झाली. चोरट्याने त्यांना पुलावरुन खाली ढकलले. प्रशांत माहूरकर यांचा रु्णालयात मृत्यू झाला. घटनास्थळावर त्यांना टुप्पटा आढळून आला. पोलिसांनी लगेच श्वान पथकाला प्राचारण केले. पोलीस हवालदार उत्तम आवळे हे जॉनी नावाच्या श्र्वानला घेऊन आले, जॉनीने दुपट्याचा गंध सुंगला आणि लालपेठकडे धाव घेतली. त्या परिसरात काही घटनास्थळावरील सीसीटिव्ही कॅमेत्यातील दृश्य बघितले. नंतर श्वान पथकाद्वारे ओळख परेड घेण्यात आली. यावेळी जॉनीने नेमके भारत मडावीला हेरले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी न्यायालयात हजर केले घटनेचा तपास रामनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies