Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सुरज बहुरिया हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक


बल्लारपूर :- बल्लारपूरातील सुरज बहुरिया या युवकाचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती याप्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आले होते मात्र मुख्य आरोपी फरार होता बुधवारला मुख्य आरोपीला आकाश उर्फ चिन्हा याला अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे कोळसा आणि दारू चा वादातून ही हत्या करण्यात आली आहे असे बोलले जात आहे बल्लारपुरातील आंबेडकर वार्ड मध्ये सुरज बहुरिया हा रात होता सूरज आणि आरोपी आकाश उर्फ चिन्ह हे दोघेही मित्र होते कोळसा आणि दारू तस्करीतून या दोघांमध्ये वाद सुरू होऊ लागले यास कारणातून आकाश उर्फ चिन्ह याने सुरज बहुरिया ला कायमचे संपवण्याचा कट रचला या कटात आरोपींनी आपल्या सहकारी मित्रांना सामावून घेत सुरज बहुरियाचा हत्याकांड घडवून आणला असे पोलिसांचे म्हणणे आहे घटनेच्या दिवशी सूरज हा बल्लारपूर शहरातील हॉटेल मध्ये गेला होता त्यानंतर आरोपी अमर अंदेवार, अविनाश बोबडे, व बादल हरणे हे तिघेही मोटरसायकलने चक्कर मारून सूरज हॉटेलमध्ये असल्याचे शहानिशा केली होती या तिघांना बघितल्यानंतर सुरजला संशय आला त्यानंतर सूरज हा आपल्या साथीदारांसह हॉटेलमधून बाहेर पडला मित्र अजित त्याच्या चारचाकी वाहनाचा ड्रायव्हरच्या सीटवर बसला यावेळी प्रणय सदन अल्फ्रेड अंथनी हे दोघेही दुचाकीने तिथे आले यावेळेस अल्फ्रेड अंथनी याने आपल्याजवळील पिस्तोलने सुरज वर गोळ्या झाडल्या व सूरज ची हत्या करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले होते या घटनेतील मुख्य आरोपी आकाश उर्फ चिन्ह हा फरार झाला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश उर्फ चिन्हला बुधवारी ताब्यात घेतले त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता दहा झाली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात धनराज कारकाळे अमोल धंदरे गोपाल प्रशांत नागोसे यांच्या पथकाने केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies