पर्यावरण आणि वन्यजीवांप्रति उदासीन असलेले अनेक जण प्लास्टिक पिशव्या आणि तत्सम कचरा रस्त्याच्या कडेला फेकतात. या कचऱ्यामुळे प्रदूषण तर होतेच, पण वन्यजीवांना याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.हे प्लास्टिक वन्यजीवांनी खाल्ल्यास त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत.त्यामुळं इको-प्रो ही स्वयंसेवी संस्था आणि मोहर्ली परिक्षेत्राच्या वन कर्मचाऱ्यांनी आज सकाळी एक अभियान राबवून पद्मापूर ते मोहर्ली असा 16 किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे प्लास्टिकमुक्त केला.
ताडोबाच्या बफर क्षेत्रात स्वच्छता अभियान
नोव्हेंबर २९, २०२०
0
Tags