राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्य शहर महासचिव पदी रोहन बांधुरकर यांची नियुक्ती
चंद्रपूर :- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.नितीन भटारकर व शहराध्यक्ष मा.प्रदिप रत्नपार्खी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपुर शहर महासचिव पदी रोहन बांधुरकर" यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती शहराध्यक्ष मा.प्रदिप रत्नपार्खी व विधानसभा अध्यक्ष मा.सुनिल काळे यांनी नियुक्ती पत्र देहून केली या नियुक्तीमुळे चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी युवक कांग्रेस ला नक्की बळ मिळेल असे बोलले जात आहे.
       यावेळेस शहराध्यक्ष राजीव कक्कड,,चारुशिला बारसागडे,रा.मी.से.जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळ्शेंडे, रा.वि.कॉं. शहर उपाध्यक्ष कुणाल ठेंगरे, रा.वि.कॉं.शहर महासचिव कार्तिक निकोडे, रा.वि.कॉ.शहर सचिव हिमांशु गुढधे, रा.वि.कॉ.शहर उपाध्यक्ष शिवम गेडाम आदी पदाधिकाऱ्यांनी रोहन बांधुरकर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Post a comment

0 Comments