अमलनाला तलावात युवकाची उडी घेऊन आत्महत्या

कोरपना:- ऐन तारुण्यात व दिवाळीच्या सारख्या सणाला कोरपना शहरातील मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या विकी बोरुले या तरुणाने शहरा लगतच्या अमलनाला तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आताच हाती लागले आहे. १२ ते १ च्या दरम्यान त्याने तलावात उडी घेतली असे काही बघणाऱ्या लोकांच्या म्हणणे आहे अद्याप पोलिसांना त्याचे प्रेत सापडले नाही आहे. हा तरुण वैवाहिक असून त्याला लहान मूल आहे. तो मागील काही दिवसापासून फार तणावात होता असे मृताच्या नातेवाइकांकडून ऐकण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण काय अद्यापही कळालेले नाही याचा शोध पोलिसांना लावावा लागेल.
Post a comment

0 Comments