चंद्रपूर : घरात एकटी असल्याचे पाहून चंद्रपूर जिल्ह्यात 90 वर्षीय वृद्धेवर युवकाने अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील महालगाव(काळू) या ठिकाणी ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महालगाव ( काळू) या ठिकाणी एक 90 वर्षीय वृद्ध महिला राहते. ही महिला झोपली असताना गावात राहणाऱ्या नरेंद्र संभाजी ननावरे (34) हा तिच्या घरात शिरला. त्यानंतर त्यांनी वीज घालवत त्या वृद्ध महिलेवर अतिप्रसंग केला.यानंतर या वृद्धेने तिचा पती आल्यानंतर त्याला याबाबतच माहिती दिली. या माहितीनंतर या वृद्ध महिलेच्या पतीने भिसी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी नरेंद्र नन्नावरे विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६,४५०,३२३ नुसार गुन्हा नोंदवून अटक केली.
या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी या युवकाविरोधात निषेधही व्यक्त केला जात आहे. तसेच गावातील महिला सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे.