ऐन दिवाळीत जिल्ह्यात 4 आत्महत्या

नापिकी, हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीची
भरपाई नाही, कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, खासगी सावकारांसह बँकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा वाढती बेरोजगारी आणि कोरोनाच्या लॉकडाउनमुळे झालेली कोंडी या प्रमुख कारणांमुळे दिवाळीच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात 4आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
अमलनाला तलावात गडचांदुर शहरातील तरुण युवकाची आत्महत्या


कोरपना:- शहरातील मेडिकल स्टोअर्स मध्ये काम करणाऱ्या विकी बोरुले नामक तरुणाने शहरा लगतच्या अमलनाला तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त आताच हाती लागले आहे. १२ ते १ च्या दरम्यान त्याने तलावात उडी घेतली असे काही बघणाऱ्या लोकांच्या म्हणणे आहे अद्याप पोलिसांना त्याचे प्रेत सापडले नाही आहे. तो तरुण वैवाहिक होता व त्याला लहान मूल सुधा आहे. तो मागील काही दिवसापासून फार तणावात होता असे मृताच्या निकट वर्तीयांकडून ऐकण्यात आले आहे. ऐन तारुण्यात व दिवाळीच्या काळात त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले याचे नेमके कारण काय याचा शोध पोलिसांना लावावा लागेल.
ऐन दिवाळीच्या दिवसात युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन केली आत्महत्या

राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परीसरातील घटना.

राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील युवा शेतकरी सुरेश बंडू दोरखंडे वय 40 वर्षे हा सकाळ च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास सुरेश हा शेताकडे जातो म्हणून निघाला. बराच वेळ होउन घरी परत न आल्याने घरचे मंडळी शोधाशोध सुरू केली.मात्र वडस्कर यांच्या शेतालगत असलेल्या झाडाला गडफास लावले असल्याचे गुराखाचा लक्षात आले तेंव्हा तो ही माहिती गावकर्यांना दिली.
सुरेश दोरखंडे यांचे कडे चार एकर शेती आहे. या वर्षी परतीच्या पावसाने शेतीचे फार मोठी नुकसान केले. शेतातील सोयाबीन, कापुस ही नगदी नुकसान झाल्याने सुरेश काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. बँक ऑफ इंडियाचे 20 हजाराचे कर्ज ही होते.
घटनेची माहिती होताच विरुर पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व उत्तरीय तपासणी साठी राजुरा येथे
नानोरी - दिघोरी येथे इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या


ब्रम्हपुरी:- आज सोमवरला सकाळी जवळपास 7.30 वाजता च्या दरम्यान इसमाने गळफास लावून केली स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक इसमाचे नाव सुरेश बरडे (50) रा. नाणोरी (दीघोरी) ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून, मृतक सुरेश च्या पाठीमागे त्याची पत्नी व दोन मुल असा आप्त परिवार असून परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. आत्महतचे कारण अजून कळले नसून पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस अधिकारी करीत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, कोरपना, राजुरा व ब्रह्मपुरी या तालुक्यातील व्यक्तींनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चिमूर:- चिमूर तालुक्यातील टेकेपार येथील रहिवासी तथा चिमूर पंचायत समितीचे माजी सदस्य मोतीराम कुळमेथे यांचा लहान मुलगा सौरभ (वय 21) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिनांक 16 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजता घडली. टेकेपार जवळ असलेल्या तळोधी (नाईक) येथील पांडुरंग दहिकर विद्यालय परिसरात असलेल्या चिंचेचा झाडाला दोर बांधून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.

Post a comment

0 Comments