26/11 हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

चंद्रपूर :- मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात पोलिस आणि जवान मिळून 18 जणांना वीरमरण आले होते. तसेच, 166 सामान्य नागरिकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या निमित्त आज समस्त इंदिरानगर शिवभक्त तर्फे इंदिरानगर येथील रेल्वे पटरी चौथा मध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संजय पटले, मनोज पोतराजे, मंगेश चौधरी, अमोल भट, आशिष ताजने, सुभाष मालेकर, आकाश चहारे,अक्षय पारधी, रोहित मराठी, कुणाल पुंडे, अंकुश राहांगडाले, अतुल चौधरी, पप्पू बोपचे, समाधान उराडे, मिलिंद मेश्राम उपस्थीत होते

Post a comment

0 Comments