लॉकडाऊनच्या काळातील सर्वसामान्य जनतेचे बीज बिल पूर्णपणे माफ करावे या मागणीसाठी 23 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे चंद्रपूर जिल्हयात चंद्रपूर महानगर, सर्व नगर परिषद क्षेत्र तसेच तालुका स्थानांवर निदर्शने करण्यात येणार आहे.
लॉकडाऊनच्या काळातील सर्वसामान्य जनतेचे वीज बिल पूर्णपणे माफ करावे या मागणीसाठी होणा-या निदर्शने आंदोलनात सकाळी 11.00 वा. गांधी चौक चंद्रपूर येथे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर सहभागी होणार आहे. चिमुर येथे आ. किर्तीकुमार भांगडीया, ब्रम्हपूरी येथे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, राजुरा येथे माजी आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल , बल्लारपूर येथे नगराध्यक्ष हरीश शर्मा, नागभीड येथे संजय गजपूरे आदी नेते सहभागी होणार आहे.
या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.