मंदिराची रंगरंगोटी करताना तोल गेल्याने युवकाचा विहिरीत पडून मृत्यू


चिमुर :- शहरातील प्रभाग क्रमांक 13 गुरुदेव वॉर्ड येथील हरणे यांच्या घरच्या विहिरीत मंदिराची रंगरंगोटी करताना तोल गेल्यामुळे विहिरीत पडून मृत्यू झाला मृतकाचे नाव रवींद्र हेमनाथ हिंगनावे (वय 35) शेळगाव सोनेगाव येथील असलेला रवींद्र हेंगणावे हा हरणे यांच्या घरी कुटुंबासह भाड्याने राहत होता. उद्यापासून नवरात्र सुरू होत असल्यामुळे भवानी मातेचा मंदिराची रंगरंगोटी करण्यासाठी मंदिराचा भिंतीवरती चढून रंगरंगोटी करत असताना तोल गेल्याने मंदिराला लागून असलेल्या विहिरीत तोल जहून पडला.
तो विहिरीत पडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला बाहेर काढत पर्यंत त्याच्या जीव गेला होता. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच चिमूर पोलीसनी घटनास्थळावर पोचून पंचनामा केला. शवविच्छेदनाचा करिता चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक अलीम शेख करीत आहे मृतक रवींद्र च्या मागे आई पत्नी 2 मुले असा आप्त परिवार आहे

Post a comment

0 Comments