ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणुक झाल्याने युवकाची आत्महत्या




चिमूर :- वर्तमान स्थितीमध्ये सर्वीकडे ऑनलाइन खरेदी वाढली असून याद्वारे अनेकांची ऑनलाइन फसवणूक सुद्धा होत आहे. चिमूर तालुक्यातील पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे (वय१८) वर्षे या युवकाने ऑनलाईन मोबाईल खरेदी केला या मोबाईलची किंमत १५ हजार रुपये होती मृतक युवकाने १० हजार रुपये ऑनलाईन पेमेंट केला व उर्वरित ५ हजार रुपये पोस्ट विभागाला देऊन पार्सल घ्यायचे होते . युवकाने पार्सल सोडविण्यासाठी पैसे नसल्याने आईकडे पैशाची मागणी केली .आईने पैशाची जुडवाजुडव करून मुलासोबत पोस्टामध्ये पार्सल सोडवायला गेले .सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीने पाठविलेले पार्सल आईने व मुलाने खोलून पाहिले असता त्या पार्सल मध्ये मोबाईल ऐवजी त्यात २ पॉकेट ; १ बेल्ट व खाली खोका अशा बिनकामी वस्तू होत्या.
युवकाला आपली मोबाइल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कंपनीच्या संपर्क क्रमांकावर फोन केला परंतु त्या कंपनीला फोन लागत नव्हता घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने १५ हजार रुपयांचा भुदंड बसल्याने घरचे आई वडील नाराज झाले होते या युवकाने या गोष्टीचा मनावर परिणाम करून घेतला . मुलगा काल ३ वा .पासून घरातून गायब होता . आई वडीलाने नातेवाईक , मित्र परीवाराकडे विचारपूस केली असता . त्याचा कुठेच पत्ता लागला नाही .आज दिनांक ९/१०/२०२० ला १०-११ च्या दरम्यान गावातील शेतकरी व महीला शेतात जात असतांना त्या मुलाची गाडी व त्या मुलाचे कपडे विहीरीजवळ दिसल्यामुळे विहिरीत त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला . रोहीत ने कमरेला दगडाने भरलेली पोतळी बांधून विहीरीत उडी घेऊन आपला जीव संपविला या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्या मोबाईल कंपनीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी गांवकरी व कुटुंबातील व्यक्तींकडून केली जात आहे.विशेष म्हणजे मृतक मुलाने 12 चे क्लासेस ऑनलाइन असल्याने रोज अभ्यास करण्यासाठी घेतला होता.

Post a comment

0 Comments