बेटिंगला भारतात कायदेशीररीत्या बंदी आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून देशभरातच बेटिंगचे जळे पसरले आहे. त्यामुळे क्रिकेट हा सभ्य मंडळींचा खेळ न राहता सट्टेबाजांचा खेळ झाला आहे. स्मार्ट फोन व इंटरनेट आल्यापासून चौका चौकात बुकी तयार झाले आहेत मॅच सुरू होण्याआधी टॉस लावण्याकरिता इंदिरानगर येथील सावित्रीबाई फुले चौक ते जाधव यांच्या घराजवळील हनुमान मंदिरा पर्यंत चौकाचौकांत सट्टेबाजांचे घोळके आढळतात. काही तरुणांमध्ये तर बेटींगचे व्यसन इतके वाढले की आयपीएल नसले तरीही वर्षभर बेटींगसाठी संधी शोधून पैजा लावताना दिसतात.
अगदी ल्युडो या खेळातदेखील हजारोंची बेटींग करून तलफ भागवतात. पैसे नसल्यास मोबाईल फोन, दुचाकीची सर्रास पैज लावली जात असते. चंद्रपुरातील इंदिरा नगर मध्ये तर मोठ्या संख्येत तरुण मंडळी सटोरी म्हणून विख्यात आहेत. आयपीएलचा हंगाम तर या सर्व सटोरींकरिता पर्वणीच ठरत आहे, तर ऑनलाइन बेटींगमधील कमिशनच्या कमाईच्या लालसेने चांगली-चांगली तरुण मंडळी बुकींच्या व्यवसायाकडे ओढले जात आहे. या प्रकाराकडे अशीच डोळेझाक झाल्यास आत्महत्या,चोऱ्या, टोळीयुद्ध, गुंडगिरीचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच यावर प्रशासनाने आवर घालून हा प्रकार बंद व्हावा, यासाठी व्यापक कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.
कोंबडा बाजारावर कारवाई होणार का ?
इंदिरा नगरातील एका चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रविवार व बुधवार ला कोंबड्याचे पाळ करताना दिसून येते पाळ झाल्या नंतर इंदिरानगरातील दर्ग्याच्या बाजूला असलेल्या खुल्या मैदाना मध्ये पैशाची होळ लावून झगडवले जातात रामनगर पोलीसाना व रामनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला त्याची माहिती काही लोकांनी फोनद्वारे दिल्ली परंतु पोलिस प्रशासन याच्याकडे पाठ फिरवली आहे. आता जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षकांनी यात स्वतः लक्ष घालावे व कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
याकडेही लक्ष देण्याची गरज...
सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीवरून रणकंदन माजले आहे. दारू किंवा तंबाखूसारख्या व्यसनांनीच संसार उद्ध्वस्त होतात, असेच ठसविण्यात येत आहे. हे खरे असले, तरी त्यासोबत चरस, गांजा, ड्रग्सची व्यसनेही वाढत आहेत. शिवाय कोंबडबाजार, सट्टेबाजी, पत्त्यांचा जुगार ही देखील एक नशाच आहे. त्याचेही अनेकांना व्यसन जडते आणि त्यांच्यासोबत त्यांचे आयुष्य व परिवारही उद्ध्वस्त होतो. त्यामुळे दारूबंदी किंवा तंबाखूसारख्या व्यसनांबद्दल चर्चा करताना या समस्यांचाही ऊहापोह होणे आवश्यक आहे.
0 Comments