Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वेकोली कोळसा खाणीत कार्यरत असलेले राजकीय पक्षाचे नेते हजेरी लावुन घरी

घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वेकोली वणी क्षेत्राच्या निलजई व नायगांव त्यास बरोबर चंद्रपुरातील कोळसा खाणीचे कामगार नेते व राजकिय पक्षांचे नेते सकाळी हजेरी लावतात व एक ते दोन तास थातुरमातुर काम करुन आपल्या घरी परत येतात.

अनेक राजकीय पक्षाचे नेते व कामगार संघटनेचे नेते सकाळी कामावर जातात व हजेरी लावुन एक ते दोन तासांनी घरी परत येतात.

८ तास काम करने बंधन कारक आहे परंतु चंद्रपूर व घुग्घुस येथील काही कामगार संघटनेचे नेते फक्त दोन तास काम करुन घरी परत जातात व दिवस भर राजकारणात व्यस्त असतात किंवा मद्यपान करण्यासाठी बाहेर जातात. ही स्थिती चंद्रपूर जिल्हातील सर्व कोळसा खाणीत आहे वीकोली अधिकाऱ्यांनी अशा कामचुकार नेत्यांवर कारवाही करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे

अश्या कामचुकार कामगार नेत्यामुळे वेकोलीच्या खाणी नुकसानीत आहे. अश्या कामचुकार कामगार संघटनेच्या नेत्यांवर व कामगारांवर वेकोली व्यवस्थापनाने कारवाही करणे गरजेचे आहे.

Post a comment

0 Comments