विदर्भ प्रोजेक्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर – शहरातील संजय गांधी मार्केट येथील विदर्भ प्रोजेक्ट कार्यालयातील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.
मृतक व्यक्तीचे नाव पराग मुने वय 44 वर्षे जगन्नाथ बाबा नगर येथील असे आहे
आत्महत्येचं कारण अद्याप कळाले नाही.

चंद्रपूर महानगर पालिकेच्या संजय गांधी संकुलात विदर्भ प्रोजेक्ट हे बांधकाम कंत्राटदाराचे कार्यालय आहे, पराग मुने हे काल रविवारला काही कामानिमित्त घरी गेले व लगेच कार्यालयात पोहचले, सकाळपर्यंत मुने घरी न आल्याने परिवारातील सदस्यांनी त्यांची शोधा सुरू केला पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.
आज सकाळच्या सुमारास विदर्भ प्रोजेक्ट कार्यालय उघडण्यात आले त्यावेळी वरच्या रूममध्ये पराग मुने हे फासावर लटकलेले आढळले.
विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल हा सकाळपर्यंत सुरूच होता, रामनगर पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह पुढील तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविलेला आहे, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Post a comment

0 Comments