काय सांगता ! कृष्णधवल टीव्हीच्या व्हॉल्व्हमधील चिपची किंमत लाखो रुपये


चंद्रपूर :- चंद्रपुरातील समाज माध्यमात सध्या जुन्या कृष्णधवल टीव्हीच्या व्हॉल्व्हमधील चिपची किंमत लाखो रुपये असल्याची अफवा पसरली आहे. म्हणून काही जणांनी इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती दुकाने व भंगार विक्रेत्यांकडे प्रत्यक्ष व फोनद्वारे जुन्या टीव्हीची चौकशी सुरु झाली आहे.


सुमारे तीस वर्षांपूर्वी लाकडी शटर असलेले कृष्णधवल दूरचित्रवाणी संच पाहण्यास मिळत. त्यातील रेडिओमध्ये व्हॉल्व्ह बसवण्यात आले होते. परत व्हॉल्व्ह आणि ट्रान्झिस्टर हे पार्ट वेगवेगळे आले. ट्रान्झिस्टरचे छोट्या आयसीत रूपांतर झाले. मात्र, काळाच्या पडद्याआड गेलेला टीव्ही व्हॉल्व्ह चिपमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.ही व्हॉल्व्ह चिप लाखो, करोडो रुपयांना खरेदी करण्यात येते अशी अफवा समाज माध्यमात पसरली. आणि ती चिप मिळवण्यासाठी अनेकांनी भंगार विक्रते यांना फोन करुन तर काहींनी प्रत्यक्ष भेट घेत पाहिजे ती किंमत घ्या पण टीव्ही असेल तर आम्हाला द्या, अशी ऑफर सुरु केली. व्हॉल्व्हमधील चिप म्हणजे स्टीलची पट्टी असून त्यात मर्क्युरी असते. त्याची किंमत अत्यल्प आहे. पण हे इलेक्ट्रॉनिक्स पार्टचे उत्पादन बाजारात मागणी नसल्याने २५ वर्षांपूर्वीच बंद करण्यात आले. सोने, चांदी हे चांगले वीजवाहक असल्याने त्यांचा वापर सूक्ष्मरीत्या काही इलेक्ट्रॉनिक्स पार्टमध्ये थर देण्यासाठी करण्यात येतो.

दरम्यान, जुन्या कृष्णधवल टीव्हीत असा कोणताही पार्ट नसून या केवळ अफवा आहेत. समाज माध्यमात अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी आता होऊ लागली आहेत.

Post a comment

0 Comments