दारू पाजून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

चंद्रपूर :- अष्टभुजा वार्डातील चिंटू सोनी या नराधमाने एका अल्पवयीन मुलाला पिण्याचे पाणी देण्याच्या बहाण्याने घरात नेले व त्याला दारू पाजून शुद्धीहिन करून त्या अल्पवयीन मुलावरती अनैसर्गिक अत्याचार केेला असून रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपी चिंटू सोनीने घरा शेजारी राहत असलेल्या पीडित अल्पवयीन मुलाला शौचाल्यास घेऊन निघाला असता अल्पवयीन मुलाने रस्त्यात पाणी पिण्यासाठी घरी जातो असे आरोपी चिंटूला सांगितले तेव्हा आरोपीने आपल्या घरी पाणी प्यायला नेले व त्या अल्पवाहिन मुलाला पिण्याच्या पाण्याऐवजी दारू पाजली.

दारू पिल्यानंतर काही वेळातच अल्पवयीन मुलगा शुद्धीहिन झाला. त्यानंतर आरोपी चिंटू सोनि याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला या घटनेची माहिती पीडित मुलाने आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पीडित मुलाचा घरचानी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी विरोधात भादंवि 377, पोस्को, ऍट्रॉसिटी अ‌ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Post a comment

0 Comments