Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मॉर्निंग वॉकला निघालेल्या तरुणांना अज्ञात वाहनाने दिली धडक ; दोघांचा मृत्यू
ब्रह्मपुरी :- शहराजवळ दोन तरुण मॉर्निंग वॉक करत असताना अचानक अज्ञात वाहनांनं त्यांना चिरडललं आणि यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुरी -आरमोरी मूख्य महामार्गावर ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मृत युवक खरकाडा गावातील रहिवासी होते. नेहमीप्रमाणे मुख्य महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने मागून या तरुणांना धडक दिली. दरम्यान वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.


या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन्ही मृतदेह ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. दरम्यान या अज्ञात वाहनाचा शोध ब्रह्मपुरी पोलीस घेत आहेत. एकाच दिवशी खरकाडा गावातील दोन युवकांचा असे अपघाती मृत्यू परिसरातील शोकाकुल वातावरण आहे.

Post a comment

0 Comments