राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चंद्रपुरात थाळी बजाव आंदोलन

५२% ओबीसी समाजाला ५२% आरक्षण द्या
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको
राष्ट्रीय ओबीसी महासंघचंद्रपूर
दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसींच्या सवैधानिक मागण्याकरिता थाली बजाव आंदोलन पुकारण्यात आले होते. मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार आमदार तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व मा. किशोरभाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर विधानसभा व मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाली बजाव आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, व सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांचे नेतृत्वात खालील मागण्याकरिता आंदोलन करून निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जातिनिहाय जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये, केंद्रात ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला १०० कोटी रूपये मंजूर करण्यात यावे, एस. सी. -एस.टी. प्रमाणे सर्व अभ्यासक्रमास शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करावी, ओबीसी शेतकरी शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन योजना लागु करण्यात यावी, महाज्योती स्वायत्त संस्थेस लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्णध करून देण्यात यावा,बिगर आदीवासी लोकांना वनपट्टयासाठी तीन पीढ्याची अट रद्द करण्यात यावी, ओबीसी कर्मचार्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे, शेतक-्यांना एस.सी. एस.टी. प्रमाणे योजना लागु करण्यात याव्या, ओबीसीचा बँकलॉग पुर्ण करण्यात यावा, या व सर्व संवैधानिक मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी थाली बजाव आंदोलन करण्यात आले. ह्या आंदोलनाकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव फंड, बबनराव वानखेडे , डॉ. सुरेश महाकुलकर, नंदु नागरकर, प्राचार्य सूर्यकांत खनके, योगेश बोबडे, गणेश आवारी, विनोद शेरकी, हरडे सर, दिवसे सर, प्रदिप पावडे, रमेश ताजणे, प्रा. नितीन कुकडे, प्रा.गौरकर, प्रा. सौ. लालसरे मॅडम, प्रा. सौ. शिंदे मॅडम, प्रा. डुडुरे मॅडम, पोर्णीमा मेहरकुरे, नंदु टोंगे अंकुश कौरासे, प्रा. महातळे,प्रा. वानखेडे, प्रा. ढवस, प्रशांत चहारे, प्रा. बोढाले, प्रा. रवी जोगी, साईनाथ उपरे, शनिकांत मस्के, राजेश कोल्हे, दिपक गोरे,चंदु माथने, सुनिल ठावरी, पेंटेवार सर, रवी टोंगे यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले.

Post a comment

0 Comments