घुगुस :- आज मंगळवारी दुपारचा दरम्यान सरदार पटेल मेमोरियल सोसायटी द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील लॅब अटेंडेंट विलास के गुरनूले (४६) रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर यांचा घुग्घुस एसीसी रस्त्यावरील जंगली झुडपात एका झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून घटनास्थळी घुगुस पोलीस दाखल झाले पंचनामा करण्यात आला ही बातमी पसरताच नागरिकांना मोठी गर्दी केली.
मृतकाचा खिशातुन ओळखपत्र निघाल्याने ओळख पटली. इसमाचे शव शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठवले आहे. हा घातपात की आत्महत्या याचा तपास घुग्घुस पोलीस करत आहे