जिल्ह्यात एकाच दिवशी दोघांची गळफास घेऊन आत्महत्याब्रम्हपुरी:- तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील देवानंद गोवर्धन राऊत ( 40 ) यांनी आज सकाळच्या सुमारास झाडालाा दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची उघडकीस आली आहे. आत्महत्येचेे कारण अद्यापही कळू शकले नाही

मृतक देवानंदच्या पाठीमागे त्याची पत्नी व दोन मुलं आई-वडील तसेच एक लहान भाऊ अंकुश राऊत इतका परिवार आहे. देवानंद च्या आत्महत्येने गाव शोककाळात बुडाला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस करीत आहेत .

एसीसी कंपनीतील कंत्राटी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर:- तालुक्यातील नकोडा येथील राकेश गुतकोंडावर (35) हा एसीसी येथे कंत्राटी कामगार असून तो. नकोडा येथील एलसी एस डब्ल्यूसीएल क्वार्टर वॉर्ड क्रमांक 3 येथे राहात होता आज सकाळी 9.30 वाजता दरम्यान घरून निघून गेला असता त्याचा मृतदेह वर्धा नदीच्या घाटावर असलेल्या राममंदिर परिसरात झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले, याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळावर जाऊन पंचनामा केला व मर्ग दाखल करून चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. पुढील तपास घुग्गुस पोलीस करित आहे.

Post a comment

0 Comments