चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदी बाबत पुनर्विचार होणारच - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी वरून गेल्या काही दिवसांपासून राजकारणी व समाजसेवक यांच्यामध्ये शाब्दिक सामना रंगलेला आहे. एका जिल्ह्यात दारूबंदी करायची व दुसऱ्या जिल्ह्यात दारू सुरू ठेवायची असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील दारूबंदी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

आम्ही निवडणूक लढतो आम्हाला जमिनीवर काय चालते ते स्पष्ट दिसते. पण जे निवडणूक कधी लढत नाही त्यांना या मधले काही समजणार नाही.दारूबंदीच्या पुनर्विचार व्हावा या मताचा मी आहे.

उत्पादन शुल्क विभागाने नेमलेली उच्चस्तरीय समिती दारूबंदीचे फायदे- तोटे यावर अहवाल सादर करणार असून, त्यानंतर दारूबंदीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Post a comment

0 Comments