चंद्रपूर शहरातील पूरग्रस्त परिसर रद्द करावे ह्या करीता स्वाक्षरी अभियान

चंद्रपूर :- म न पा च्या चुकी मुळे चंद्रपूर शहरातील बहुतांश परिसर पूरग्रस्त घोषित झाला आहे
आणि पूरग्रस्त घोषित झाले ला निर्णय रद्द करण्यात यावा ह्या करीता चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या नेतृत्वात आज दिनांक 21/10/2020 ला आकाशवाणी परिसरात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले या वेळेस रा.यु.कॉं.शहर सचिव मयुर सेठ्या, रा.वी.कॉं.शहर उपाध्यक्ष कुणाल ठेंगरे, रा.वी.कॉं.शहर महासचिव कार्तिक निकोडे, रा.वी.कॉं.शहर उपाध्यक्ष शिवम्ं गेडांम, रा.वी.कॉं.शहर सचिव हिमांशू गुडधे, प्रणय कुल्मेथे,चैतन्य कापूरकर,लोकेश यादव आदी कार्यकर्ते उपस्तीत होते.

त्यातच ह्या स्वाक्षरी अभियानात परिसरातील जनतेनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला
आणि ही स्वाक्षरी अभियान चंद्रपूर शहरातील संपूर्ण पूरग्रस्त परिसरात होणार आहे पूरग्रस्त भागातील 5000 हजार पेक्षा अधिक जनतेची स्वाक्षरी घेऊन समस्त पुरग्रत भागात ही स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे जनतेनी ह्यात आपला सहभाग घ्यावा
असे आव्हान राजीव कक्कड ह्यांनी केले आहे

Post a comment

0 Comments