शिवसेना वचननामा ही तर जनतेची फसवणूक: आपची पोलिसात तक्रार Shivsena Uddhav Thakre
चंद्रपुर जिल्ह्यात 16 पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी दाखल - सुनिल मुसळे जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये शिवसेना प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील वीज ग्राहकांना (जनतेला) काही वचन दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते. यांच्या वचननाम्याची प्रत सोबत जोडली आहे. या अत्यंत महत्वाच्या आश्वासनाचा प्रचार त्यांनी विदिओ, पत्रके, भाषणे, ट्विटर अश्या विविध माध्यमातून केला होता. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या ५६ उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मा.मुख्यमंत्री झाले.

यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे यांची राजकीय आणि नैतिक जवाबदारी होती, परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केलेली आहे. या उलट देशात आणि राज्यात महामारीचे संकट असतांना दि.१ एप्रिल २०२० पासून वीज दरवाढ करून राज्यातील जनतेला फसवले आहे. तसेच रु ३ प्रति युनिट प्रमाणे तयार होणारी विज रु १५ प्रमाणे देवून जनतेची लूट चालू आहे. 

फसवले गेलेल्या जनतेला घेऊन आम आदमी पार्टीने वीजबिल माफी व किमान वीजदर कपातीची मागणी मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे. त्यासाठी सोशल मिडिया वरून मागणी, निदर्शने, इमेल पत्र व पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे वीजबिल माफ करण्याचे वा दरकपातीसाठी हजारो अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिले आहेत. पालक मंत्र्यांच्या घराचा घेराव, वीज कार्यालयांना ताला ठोको अशी आंदोलन केली परंतु सरकारने यास प्रतिसाद दिलेला नाही.

ज्या अर्थी सरकारपक्ष असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री निवडणुकी दरम्यान दिलेले आश्वासन पाठपुरावा करूनही पाळत नाही त्याअर्थी ही जनतेची जाणीवपूर्वक केलेली फसवणूक आहे. भारतीय दंड संहिता कलम ४१५ ( फसवणूक ) आणि ४२० ( अप्रामाणिकपणा – बेईमानी ) प्रमाणे हा गुन्हा आहे . तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम १२३ (ब) (भ्रष्ट व्यवहार-पद्धती) प्रमाणे मते मिळवण्यासाठी खोटी आश्वासने देता येत नाहीत. ही जनतेची फसवणूक ठरते. 

याच पद्धतीने जर आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत असेल तर त्या व्यक्ती वा संस्थेवर IPC ४२० अनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. अशाच प्रकारचे आमिष दाखवून राज्यात श्री उद्धव ठाकरे राज्याचे मा.मुख्यमंत्री झाले आहेत व आता जाणीवपूर्वक आश्वासन न पाळून जनतेची फसवणूक करीत आहेत. एवढेच नव्हे तर महामारी च्या संकट काळी वीजदर वाढवून जनतेसोबत बेईमानी केली आहे.

त्यामुळे महामारीच्या संकटामुळे पिडीत आणि फसवल्या गेलेल्या जनतेच्या वतीने राज्याचे मा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे २ ऑक्टोम्बर रोजी सत्याचा आग्रह म्हणून राज्यभरात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच चंद्रपुर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे यांचे नेतृत्वात दुर्गापुर, पडोली, घुग्गुस येथे तक्रार दाखल करण्यात आली याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी,पंकज रत्नपारखी,अशरफभाई ऑटो युनियन अध्यक्ष अमजदभाई उपस्थित होते मुल येथे राज्य कमेटी सदस्यअॅड.पारोमीता गोस्वामी उपाध्यक्ष विजय सीद्धावार तालुका अध्यक्ष अमित राऊत युवा संयोजक गौरव शामकुले तसेच राजुरा येथे जिल्हा संघटन मंत्री परमजित सिंग झगडे मिलिंद गड्डमवार तालुका संयोजक रोशन येवले कृषी विंग्ज संयोजक स्वप्निल कोहपरे सहसंयोजक संतोष तोगरे युवा संयोजक विजय कंपलीवार आकाश चौथले विरुर स्टेशन येथे पवन ताकसांडे चिमूर येथे डॉक्टर अजय पिसे ,आदित्य पिसे ,मंगेश शेंडे ,कैलास भोईर इत्यादी तसेच बल्लारपूर येथे शहर संयोजक बलराम केसकर ,आसिफ शेख ,रवी पप्पुलवार भद्रावती येथे तालुका संयोजक सोनल पाटील सिंदेवाही येथे तालुका संयोजक शशिकांत बदकमवार शांताराम आदे सावली येथे अनिल मडावी नागभीड येथे ञिलोक बघमारे ईत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे उपस्थितीत विविध ठीकाणी तक्रार नोंदविण्यात आली.

Post a comment

0 Comments