त्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला


सावली / प्रतिनिधी
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची सीमा असलेल्या वैनगंगा नदीत प्रेमीयुगुलानी उडी मारल्याची घटना शुक्रवारी घडली होती रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात मृतदेहाचा शोध घेण्यात आला. मात्र, यश आले नव्हते. शनिवारी सकाळपासूनच पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, पुलापासून दहा किलोमीटर अंतरावर प्रतीक गिरडकर या मुलाचा मृतदेह शोध पथकाला आढळला. तर मुलीच मृतदेहाचा उशिरापर्यंत शोध सुरू होता.


गडचिरोली येथील असलेले हे प्रेमीयुगुल एका दुचाकीने वैनगंगा नदीच्या पुलावर आले. बराच वेळ ते पुलावर चर्चा करीत असल्याने अनेकांनी पाहिले. दरम्यान, अचानक दोघांनीही पुलावरून
पाण्यात उडी घेतली. दरम्यान, ही माहिती सावली पोलिसांना कळताच सावलीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांची गर्दीही जमली. शुक्रवारी
उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध घेण्यात आला. मात्र, शोध पथक लागला नव्हता. शनिवारी परत दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली.घटनास्थळापासून दहा किमीवर प्रतीकचा मृतदेह आढळून आला. मात्र, मुलीचा मृतदेह शनिवारीही उशिरापर्यंत पोलिसांना सापडला नव्हता. त्यामुळे रविवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. मृतक प्रेमीयुगुल हे अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

Post a comment

0 Comments