न जुमानता आपल्या प्रेमासाठी स्वतःच्या परिवाराला सोडून पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांच्याकडूनवेगवेगळे प्रयोगही केले जातात. मात्र नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशाच.
एका प्रेमप्रकरणातील मुलीचे लग्न ठरल्याने तिने चक्क दहा रुपयाच्या नोटेवर आपल्या प्रियकराला आपल्याला घरून पळवून नेण्याचा संदेश लिहून पाठवला आहे. ही दहाची नोट सोशल मीडियाच्या अनेक ग्रुप वर व्हायरल होत असून या पिंटू प्रियाची गल्लोगल्ली चर्चा होऊ लागली आहे. या प्रेमिकेने आपल्या घरातील सदस्यांना कानोकान खबर लागू न देता दहा रुपयाच्या नोटे च्या आधार घेत प्रियकराला निरोप दिला. मात्र हे पिंटू प्रिया कोण व कुठचे हे कळू शकले नाही. यापूर्वी अशा प्रेम प्रकरणांमध्ये प्रेम वीरांनी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी विविध मार्गाच्या अवलंब केल्याचे सर्वश्रूत आहे. अलीकडच्या काळात तर मोबाईल हे संपर्काचे सर्वात मोठे व सहज सुलभ माध्यम आहे पण परिवाराकडून तेचमोबाईल जप्त झाले असल्याने प्रेमिकेने नामी शक्कल लढवत चक्क नोटाला चापला संदेश वाहक बनवून टाकले असावे. असे निष्क्रिय अनेक नागरिक आढळत आहे. आपल्या प्रियकराला पर्यंत आपल्या भावना पोहोचविण्यासाठी या तरुणीचे थेट देशाच्या अर्थव्यवस्थेचे माध्यम असलेल्या नोटेच्या वापर करून प्रेमासाठी वाटेल ते चा प्रत्यय दिला हा प्रकार म्हणजे स्वतःच्या प्रेमात करिता आई वडिलांचे स्वप्न धुळीस मिळवताना आपण आपल्या आई वडील कुटुंबाबरोबर नियोजित वर पक्षाला देखील कुठल्या अवस्थेत घेऊन जात आहो याबाबत तमा न बाळगता संकुचित वृत्तीचे प्रतिनिधित्व करणार आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही