चंद्रपूर :- येथील बहुचर्चित मनोज अधिकरी हत्याकांडातील फरार असलेल्या युवतीने अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात अर्ज केला आहे मात्र तिच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळवा अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली असल्याची सूत्राकडून माहिती मिळत आहे.
मनोज अधिकारी हत्या प्रकरणात नगरसेवक अजय सरकार रवींद्र बैरागी धनंजय देवनाथ या तिघांना अटक करण्यात आली आहे तर एक युवती फरार आहे हे युती अटक न झाल्याने तपास पुढे सरकत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे त्या युवतीच्या शोधार्थ पोलीस नागपूरला जाऊन रिकाम्या हाताने परत आले तेव्हापासून त्या युतीचा पत्ताही पोलिसांना लागला नाही. तिच्या मोबाईल बंद असल्याने पोलिसांना शोध घेण्यास अडचण येत आहे दरम्यान गुरुवारी त्या युवतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. चंद्रपूर पोलीस मृत्यू मनोज अधिकारी यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमधून काही माहिती मिळेल का हे तपासून बघत आहे परंतु त्यांना काही सुगावा लागलेला नाही
आरोपींची पोलिस कोठडी वाढवणार
मनोज अधिकारी प्रकरणात अटकेत असलेल्या तीनही आरोपींची पोलीस कोठडी शुक्रवारी संपत आहे मात्र अद्यापही सत्तेचे मूळ कारण पोलिसांच्या हाती लागले नाही आरोपींची पोलिस कोठडी वाढवून मागणार असल्याची माहिती तपास अधिकारी जितेंद्र बोबडे यांनी दिली
0 Comments