पांढरकवडा येथील नाली बांधकामा लगतचा अवैध रेती साठा जप्त

सत्ताधारी एका राजकीय पक्षाच्या शहर अध्यक्षाची "तो मि नव्हेच" अशी भुमिका

घुग्गुस :- येथून जवळच असलेल्या पांढरकवडा येथे महसुल विभागाने धाड टाकुन १० ते ११ ब्रास जवळपास अवैध रित्या साठवून ठेवलेला रेती साठा जप्त केला.

पांढरकवडा ग्रामपंचायत कार्यालया समोर मोठ्या नालीचे बांधकाम एका खाजगी कंपनीच्या वतिने करण्यात येत आहे.

या नाली बांधकामाचे कत्रांट घुग्गुस येथील सत्ताधारी एका राजकीय पक्षाच्या शहर अध्यक्षाला दिल्या गेले आहे.

नालीच्या बांधकामात पांढरकवडा येथुन जवळच असलेल्या वढा रेती घाटाच्या अवैध रेतीचा वापर करण्यात येत होता. नालीच्या बांधकामासाठी रस्त्यालगतच मोठ्या प्रमाणात अवैध रित्या रेती साठा जमा करून ठेवण्यात आला होता.

हा रेती जप्त करुन महसुल विभागाच्या अधिका-यांनी संबंधीत सत्ताधारी एका राजकीय पक्षाच्या शहर अध्यक्ष व कंत्राटदारास रेती साठ्या विषयी विचारनी केली असता तो मि नव्हेच अशी भूमिका घेतल्याने तो रेती साठा महसुल विभागाने जप्त केला असुन संबंधितांना नोटीस बजावनार असल्याची माहिती उत्खनन अधिकारी अल्का खेडकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे.

Post a comment

0 Comments