बंगाली कॅम्प परिसरात मोठा तणाव शेकडो समर्थक रस्त्यावर – मनोज अधिकारी हत्या प्रकरण

काल शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात युवा नेता मनोज अधिकारी ह्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर कालपासून बंगाली कॅम्प परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

आज शवविच्छेदन झाल्यावर मनोज अधिकारी ह्याचा मृतदेह घरी पाठविण्यात आला मात्र समर्थकांनी बंगाली कॅम्प चौकात शववाहिका अडवून धरली. आज सकाळपासूनच बंगाली कॅम्प भागात गटागटाने लोक उपस्थित होतेच त्यामुळे काहीतरी घडणार ह्याची पोलिसांसह सर्वांना खात्री होती त्यामुळे आधीच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

मनोज अधिकारी ह्यांच्या शेकडो समर्थकांनी बंगाली कॅम्प भागात मोठी गर्दी केली होती व काल अटक केलेल्या दोन्ही आरोपींना इथे आणण्यात यावे ह्या मागणीसाठी त्यांचे आंदोलन सुरू होते. मात्र पोलिसांनी जमावाला शांत करून स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.


स्थानिक दुर्गा मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष असल्यामुळे मनोज अधिकारी ह्यांचे पार्थिव आधी दुर्गा मंदिर परिसरात आणण्यात आले मात्र त्यानंतर समर्थकांनी आरोपींना बंगाली कॅम्प परिसरात आणल्याशिवाय शव हलविणार नाही अशी भुमिका घेऊन शव वाहिकेसमोर झोपल्यामुळे शववाहिका बराचवेळ तिथेच अडकून पडली होती त्यामुळे शेवटी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले आणि पार्थिव त्याच्या घरी रवाना करण्यात आले ह्यावेळी या वेळी खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, रामनगर पोलीस निरीक्षक हाके तसेच काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, भारत गुप्ता नगरसेवक, अमजद अली, उत्तम शहा ह्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मोलाचे कार्य केले.


तरीही परिसरात अजुनही तणाव असुन भविष्यात ह्या घटनेचा उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Post a comment

0 Comments