लॉकडाउनमुळे सात-आठ महिन्यांपासून बंद असलेले जिम सुरू

चंद्रपूर : लॉकडाउनमुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद असलेले जिम, फिटनेस क्लब व्यायामशाळा सोमवारपासून सुरू झाल्या. मात्र पहिल्या दिवशी चंद्रपूरकरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जिम मालकांमध्ये थोडी निराशाही दिसून आली.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी 'सोशल डिस्टंसिंग'च्या अटींवर परवानगी दिल्यानंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर बहुतांश जिम सुरू झालेत. पहिल्या दिवशी बोटावर मोजण्याइतक्याच फिटनेस इच्छुकांनी जिममध्ये हजेरी लावली. मात्र, हिवाळा सुरू झाल्याने हळूहळू गर्दी करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


Post a comment

0 Comments