चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची दारू बंदी कायम ठेवावी डॉ. प्रकाश आमटे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


डॉ. प्रकाश आमटे यांची प्रथमच दारूबंदी बद्दल उघड भूमिका

चंद्रपूर :- आपत्ती व्यवस्थापन तथा बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असताना जनतेच्या हितासाठी दारूबंदी असणे आवश्यक आहे दारूबंदीला माझे समर्थन असून राज्य सरकारने चंद्रपूर व गडचिरोली या दोनही जिल्ह्यामध्ये दारू बंदी कायम ठेवावी अशी मागणी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ प्रकाश आमटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली.

 गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली, शासकीय दारूबंदी नंतर गावा-गाबातील संघटनेने त्यांचे गावात दारूबंदी लागू केली. गडचिरोलीच्या दारूबंदीला माझे समर्थन आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये. उलट दारूमुक्तीकडे बाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती कराबी. चंद्रपूर जिल्ह्याची दारूयंदी 2015 साली झाल्यामुळे सीमेबरून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणे थांबले आहे. म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी अजिबात उठवू नये. उलट तिथे देखील गडचिरोली सारखे दारूमुक्तीचे यशस्वी अभियान शासनाद्वारे सुरु करण्यात यावे.
अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून करण्यात आली.

Post a comment

0 Comments