राजुरा :- तालुक्यातील मौजा सिंधी येथे शेतातील मोटारपंप चालू करत असताना विजेचा शॉक लागून मुलीचा व बापाचा मृत्यू झाला मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी आपल्या शेतात पाणी देण्याकरिता पाण्याचा मोटारपंप सुरु करण्यास गेलेल्या स्वप्नील सत्यपाल चहारे (वय 32 वर्ष) याला विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झाला व बाजूला उभी असलेली 6 वर्षीय मुलगी इच्छाही जागीच मृत्यू झाला ही घटना सकाळी 11 वाजता उघडकीस आली. घटनास्थळी विद्युत विभागाचे कर्मचारी व पोलीस पोहचले आहेत.