Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयात कंत्राटी भरती
चंद्रपूर 21 ऑक्टोंबर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर जीवशास्त्रज्ञ व जीआयएस तज्ञ पदाच्या जागा भरावयाच्या आहेत. याबाबत अधिक माहिती www.mahaforest.gov.inwww.mytadoba.org या संकेतस्थळावरुन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विविध कार्यालयामध्ये नोटीस बोर्डावर तपशिल दिलेला आहे. परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, मुल रोड, चंद्रपूर-442401, दुरध्वनी क्रमांक 07172-251414 यांच्या कार्यालयास पोस्टाने, समक्ष, ई-मेलव्दारा (ccffdtadoba2@mahaforest.gov.in) 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे.प्राथमिक छाननीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनी संदेश, पत्र, ई-मेलव्दारे कळविण्यात येईल. तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies