Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ऑक्सिजनअभावी महिलेचा मृत्यू चंद्रपूर कोविड सेंटरची अवस्था चव्हाट्यावर
चंद्रपुरातील कोविड रुग्णालयात रुग्णांची कशी हेळसांड होत आहे, याचा नमुना बघायला मिळाला. उपचाराभावी शेवटी एका महिला रुग्णाला आपला जीव गमवावा लागला.

इथल्या कोविड रुग्णालयात एक महिला शुक्रवारी दाखल झाली. कोरोनाबाधित असल्याने तिची ऑक्सिजन पातळी खालावली होती. व्हील चेअरवर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिचे नातेवाईक ऑक्सिजनची आणि तातडीच्या उपचाराची मागणी करीत होते.पण उपस्थित डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांनी तिला साधे दाखलही करून घेतले नाही. आरडाओरड केल्यानंतर तासाभरानंतर तिला बेड मिळाला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

शेवटपर्यंत तिला ऑक्सिजन मिळू शकला नाही आणि तिचा मृत्यू झाला. शासकीय कोविड हॉस्पीटलमधील या अनागोंदीवर अनेकदा टीका झाली. लोकांनी असंतोष व्यक्त केला. इतकेच नाही, तर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलवर दगडफेकसुद्धा केली आहे. पण तरीही यातून कोणतीही सुधारणा हॉस्पिटल व्यवस्थापन करीत नाही. अशा अनास्थेमुळेच लोकांचे जीव जात आहेत. शुक्रवारी झालेला या महिलेचा मृत्यू हा त्यापैकीच आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करावी आणि इतर रुग्णांचा तरी जीव वाचवावा, अशी मागणी या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies