बिनव्याजी कर्ज योजना व व्यवसाय समुपदेशन व मार्गदर्शन कार्यशाळा


युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.19 ऑक्टोबर: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना, कार्यपद्धती आणि व्यवसाय समुपदेशन याविषयावर ऑनलाईन पद्धतीने वेबीनारच्या माध्यमातून समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम दि. 22 ऑक्टोंबर 2020 रोजी दुपारी 12 ते 1.30 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

या वेबिनार मध्ये मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, नागपूर विभागाच्या संचालक आसावरी देशमुख समुपदेशन व मार्गदर्शन करणार आहे.कार्यक्रमात गरजू युवक-युवतींनी सहभागी होण्याकरिता गुगल मिट या ॲपचा उपयोग करावा. तसेच http://meet.google.com/gnx-fuyf--jpj या लिंकचा उपयोग करून वेबिनार मध्ये सहभागी होता येईल.
कार्यक्रमाच्या अधिक माहितीकरिता महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अमरीन पठाण मो.9823819137 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त उमेदवारांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments