यामध्ये रवींद्र बैरागी, नगरसेवक अजय सरकार व धनंजय देबनाथ चा समावेश आहे.
आरोपीना न्यायालयात हजर केले असता 5 ऑक्टोम्बरपर्यंत पोलीस रिमांड मिळाली आहे.
रामनगर पोलिसांनी मृतक मनोज यांच्या फ्लॅटवरून काही आपत्तीजनक वस्तू सुद्धा जप्त केल्या आहे.
1 कुऱ्हाड, 2 कटर, कंडोमचे 6 सीलबंद पॅकेट, हेयर पिन, रिकामी असलेली टॅबलेट स्ट्रीप, व मिठाई पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त करीत पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठविले आहे.आरोपींमध्ये रवी बैरागी हा कॅटरिंग व्यवसायी असून धनंजय देबनाथ हा फोटोग्राफर व मनपा नगरसेवक अजय सरकार यामध्ये तिन्ही आरोपींच काय कनेक्शन आहे ते तपासात निष्पन्न होणारचं.
या प्रकरणात चौथी आरोपी महिला आहे, मिळालेल्या माहितीनुसार ती महिला नावाजलेली असून, शहरात व जिल्ह्यात त्यांचे शुभचिंतकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
या हत्याकांडात नवीन चर्चेला पेव फुटले आहे की रवी बैरागी यांनी मनोज कडून 12 लाख रुपये घेतले होते ते पैसे परत मिळावे यासाठी मनोज रवी वर दबाव टाकत होता.पोलीस तपास जेव्हा पूर्ण होणार त्यावेळेस या हत्याकांडाच नेमकं कारण समोर येणार.