चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा ) येथील विधवा वनिता उत्तम शिवरकर या झोपडीवजा मोडक्या दोन खोल्यांच्या घरात राहतात.काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचे कसेबसे पालन पोषण करतात. मात्र, वीज वितरण विभागाच्या गोंधळाने तिला चक्क ६५ हजार ५२० रुपयांचे बिल आले. एवढे मोठे वीज बिल कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे काम नाही व त्यामुळे पैसा नाही. अशा परीस्थितीत आलेल्या अवाढव्य बिलाने या गरीब विधवेची चिंता वाढवली आहे.
आलेले अवास्तव बिल कमी करण्याबाबत वनिताच्या मुलाने महावितरण कार्यालयाचे खेटेही घातले. वनिताचे घर अवघे दोन खोल्यांचे. त्यांच्या घरात दोन किंवा तीन लाईट आणि एक छोटा टीव्ही. अशा घरात साधारण महिन्याचे लाईट बिल साधारण ५०० ते ८00 रुपयांपर्यंत येणं अपेक्षित आहे. त्यांनी महावितरणकडे नव्या मीटरची मागणी केली आहे.
0 Comments