Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वेकोलीच्या सेफ्टी ऑफिसरची वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या
चंद्रपूर :- घुग्घुस येथील जनता महाविद्यालयातील शिक्षक असलेले विठोबा पोले यांचा मुलगा अमित पोले वय 30 वर्ष हा WCL बल्लारपूर येथे सेफ्टी ऑफिसर पदावर कार्यरत होता त्याने दिनांक 11 सप्टेंबर रोजी वणी तालुक्यातील पाठाळा येथील वर्धा नदीत सांयकाळी 04 वाजता उडी घेऊन आत्महत्या केली.
वणी पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल असून घुग्घुस काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे कार्यकर्त्या सह शोध मोहीम राबविली असता आज दिनांक 12 संप्टेंबर रोजी दुपारी 01 वाजता काँग्रेस कार्यकर्ते कोंडय्या तराला यांनी शव वणी तालुक्यातील बेलोरा – नीलजय घाटात शोधून राजूरेड्डी यांना माहिती दिली व प्रेत वाहून जाऊ नये म्हणून पोलिसांना सूचना देऊन बाहेर काढले व कुटुंबियांना माहिती दिली.
आत्महत्येचे कारण अद्याप माहीत झाले नसून या आत्महत्येची माहिती देण्यास सोशल नेटवर्कने महत्वपूर्ण कार्य केले.
पुढील तपास पोलीस करत आहे.

Post a comment

0 Comments