बल्लारपूर – कोरोना पॉझिटिव्ह ने 26 वर्षीय युवकावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार टेकडी परिसरातील पंडित दीनदयाल वार्डातील गौशाळेत काम करणाऱ्या 26 वर्षीय मूकबधिर युवकावर एकाने 1 सप्टेंबरच्या रात्री त्या मुकबधिरावर जबरदस्ती करीत अनैसर्गिक कृत्य केले.
सकाळी जेव्हा ही बाब पीडित युवकाने हातवारे करीत आपल्या मालकाला सांगितली त्यानंतर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.
पीडित युवकाने आरोपीला ओळ्खल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली, सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने व जिल्हा कारागृहातील कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने सर्वांची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे, या प्रकरणातील आरोपीची सुद्धा चाचणी करण्यात आली तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला.चाचणी अहवाल पोलिसांना माहीत पडल्यावर पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली.
आरोपीला तात्काळ संस्थात्मक विलीगिकरण केंद्रात पाठविण्यात आले असून संपर्कात आलेल्या पोलिसांनी स्वतःला गृह अलगीकरणात ठेवले आहे, पीडित युवकाची सुद्धा अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे.