चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदलीचंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची दि. 17 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशान्वे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अरविंद साळवे हे रुजु होणार आहेत.अरविंद साळवे हे आतापर्यंत भंडारा येथील पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
दि. 17 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील सुमारे 22 पोलीस अधिक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. अरविंद साळवे हे चंद्रपूरचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून रुजु होणार असले तरी चंद्रपूरचे सध्याचे पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना मात्र पदस्थापना देण्यात आली नाही. त्यांच्यासह अन्य 13 अधिकार्‍यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमीत करण्यात येणार आहेत.


Post a comment

0 Comments