युवकांच्या मृत्यूने चंद्रपूर कोविड केअर परिसरात तणावाची स्थिती Tension situation in Covid Care area due to death of youth

  🖕मृतक युवकांचा भावाची प्रतिक्रिया🖕 

चंद्रपूर – कोरोनाची भीती दाखवत आज अनेकांचा बळी जात आहे, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, रुग्णांची वाढती संख्या पण डॉक्टर नाही, नागरिकांनी जायचं तरी कुठे?
शहरातील रईस अहमद नामक युवकाची खाजगी हॉस्पिटलमध्ये चाचणी केली असता त्याचा अहवालात टायफाईड निघाल्याने त्याच्या भावाने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता सायंकाळी त्याचा मृत्यू झाला, हा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप रईस च्या मोठ्या भावाने केला आहे.कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही, कोविड केअर मध्ये फक्त 4 डॉक्टर्स आहे, बाकी डॉक्टर हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण वाऱ्यावर सोडण्यात आले.
युवकांच्या मृत्यूने काही काळ हॉस्पिटल परिसरात तणाव निर्माण झाला होता, त्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी यासाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
प्रशासनाने कोरोनावर काही नियोजन न केल्याने आज नागरिक मृत्युमुखी पडत आहे, प्रशासनातील पालकमंत्री, डॉक्टर्स, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता हे निष्काळजीपणा करीत आहे असा थेट आरोप नागरिकांनी लावला आहे.

Post a comment

0 Comments