पोलीस स्टेशनच्या मालखाना फुटल्याची चर्चा !पोलिसच तर चोर नाही नां या अफवांना शहरात ऊत !

चंद्रपूर शहरामध्ये, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन व रामनगर पोलीस स्टेशन असे दोन पोलीस ठाणे आहेत. या दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे स्वतंत्र असे मालखाने आहेत. या मालखान्या मध्ये चोरीचे साहित्य ठेवले जातात. परंतू 2015 पासून हे मालखाने अवैध दारूने खचाखच भरलेले आहेत. आज शहरातील या दोन पोलीस स्टेशन पैकी एका पोलीस स्टेशनच्या मालखाना फुटला याची चर्चा शहरात सुरू झाली. पोलीस स्टेशनच्या मालकांना जर सुरक्षित राहत नसेल तर साधारण जनतेची सुरक्षा पोलीस कशी करू शकतात हा एक वेगळा वृत्ताचा भाग आहे. या संबंधात आमच्या टीमने कोणत्या पोलीस स्टेशनच्या मालकांना फुटला यासंबंधात तपास केला असता पोलीस चोर असल्यामुळे यासंबंधातील कोणतेच अधिकृत वृत्त बाहेर येऊ शकले नाही. मात्र ही चर्चां सत्य असल्याची दबक्या आवाजात पोलीस स्टेशनमध्ये चर्चा सुरू होती. पोलीस स्टेशनच्या मालखाना फुटला, यात जर तथ्य आहे तर याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी व स्वतः कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी करायला हवा. प्रत्येक मालखाना हा सिसीटिव्ही च्या कैदेत आहे. या सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी अवश्य व्हायला हवी. स्वत: कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. मालखान्यामधून दारू चोरी झाली असेल तर काही हरकत नाही परंतु एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या तपासात येणारे साहित्य अवजारे यांची या ठिकाणी उचलबांगडी  झाली असेल तर ती घातक आहे व मालखान्यातील ही चोरी सुद्धा तेवढीचं घातक आहे.

Post a comment

0 Comments