गोंडपिपरी :- कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापारपेठ बंद ठेवणे हा एकमेव उपाय नाही. गोंडपिपरी तालूक्यात कोरोनाचा शिरकाव जबादार शासकीय अधिकाऱ्यांमार्फत झाले. तसेच शहरात ये-जा करणा-या कर्मचा-याव्दारे कोरोनाचा फैलाव होत आहे. असे असताना व्यापारपेठ बंद करुन व्यापा-याना वेठीस धरने योग्य नाही. परत लाॕकडाऊन गोंडपिपरी व्यापा-यांवर लादल्यास त्याचा तिव्र विरोध करु असा पवित्रा घेतला असल्याचे गोंडपिपरी व्यापारी असोसिऐशनी 7 सप्टेंबरला गजानन काॕलेजमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले
सुरुवातीला देशावरील आपत्ती म्हणुन सर्व व्यापारी बांधवानी आपला व्यापार बंद ठेवुन सहकार्य केले. बाजारपेठ बंदीमुळे व्यापा-यांचे कंबरडे मोडले असताना शासनाकडून कुठल्याही सवलतीची अपेक्षा केली नाही. उलट विजेचे बिल, ईएमआयचे हप्तेही मुकाट्याने भरले. असे असताना परत लाॕकडाऊन करुन व्यापा-यांनाच वेटीस धरणे चालु आहे. जेंव्हा की व्यापारी प्रतिष्ठानापेक्षा सरकारी कार्यालये, बँकामध्ये अधिक गर्दी होत असते. तसेच अनेक कंन्टेनमेन्ट झोनमधुन गोंडपिपरी येथिल शासकीय कार्यालयात पाचशे ते सहाशे कर्मचारी रोज ये-जा करीत असतात. त्यांच्यामुळे शहरात कोरोनाचा फैलाव होत आहे. संक्रमन वाढविणा-या शासकीय अधिकारी व कर्मचा-यावर कुठलीही कारवाई नाही पण उगाचच व्यापा-यांनाच वेटीस धरले जाते. हा शासन व प्रशासनाचा कुठला न्याय आहे? असा रोखठोक जाब गोंडपिपरीतील व्यापा-यांनी विचारला आहे.
होय !…तरच लाॕकडाऊनला समर्थन !!
खरोखरच गर्दीमुळे संसर्ग वाढत असेल तर सरकारी कार्यालये, बँका व गर्दी होणारी सर्वच स्थळे बंद करण्यात यावे.
जसे बंदीमूळे व्यापा-याचे आर्थिक नुसकान होते तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगार देवु नये. शासकीय कर्मचा-याने कोरोना फैलाव करण्याचे पाप करावे आणि व्यापा-याना आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावे. असे मुळीच चालणार नाही. असा संताप व्यापाऱ्याने व्यक्त केला. अन्यायकारक लाॕकडाऊन लादल्यास गोंडपिपरी व्यापारी संघटना तिव्र विरोध करणार असे व्यापा-याने सांगितले.
पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर सुरकर, उपाध्यक्ष रितेश वेगिनवार, सचिव अजय माडूरवार व व्यापारी निलकंठ गौरकर,सुहास माडुरवार, प्रदिप बोनगिरवार, अमित वेगिनवार, विष्णु हिवरकरसह अनेक व्यापारी उपस्थित होते.