महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संपुर्ण राज्यात “रोजगार दो” या आंदोलन करण्यात येत आहे, प्रदेश अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे व चंद्रपूर जिल्हा प्रभारी इरशाद शेख यांच्या आदेशानुसार, प्रदेश महासचिव शिवानीताई वडेट्टीवार व माजी लोकसभा अध्यक्ष शिवा राव यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार यांच्या नेतृत्वात मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फ़त निवेदन देउन थेट केंद्र सरकारला त्यांचा आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपुर्वी वर्षाला युवकांसाठी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होउन युवकांना नोकरी अथवा रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. कोरोनाच्या महामारीत जवळपास १२ ते १३ कोटी लोकांचा रोजगार बुडाल्याने आज सर्व सामान्यांना उपासमारीची वेळ आली आहे. अशा कठीण प्रसंगी केंद्र सरकारने योग्य ते पाउल उचलून सर्व सामान्यांच्या परीस्थितीचा गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन देताना प्रदेश सचिव रुचित दवे, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, जिल्हा महासचिव- इमरान खान, रमीज़ शेख, सुरज कन्नूर, भानेश जंगम,
जिल्हा सचिव- वहीद शेख, सुमेध चंदनखेडे, अजय चिन्नूरवार, घुग्घुस अध्यक्ष तौफिक शेख, अक्षय मिस्त्री, अजय कलवल व युवक काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.